Headlines

सावंतवाडी शहरांमध्ये शहर चौकी कार्यान्वित करावी…

ॲड. संजू शिरोडकर ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.११-: शहर दिवसे दिवस विस्तारित होत असून शहराची लोकसंख्या वाढत आहे त्या कारणास्तव शहरांमध्ये मध्यवर्ती शहर पोलीस चौकी चालू करा याबाबतचे निवेदन माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी दरम्यान सध्यास्थितीत चितारआळी उभा बाजार येथे पोलीस ठाणे असलेली…

Read More

कासार्डे विदयालयातील ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा गुणगौरव

⚡कणकवली ता.११-: कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन 2022/ 23 या वर्षात शालेयस्तर, जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या सुमारे ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा गुणगौरव कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समिती पदाधिकारी, स्कुल कमिटी पदाधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या शुभहस्ते नुकताच प्रशालेच्या डिजिटल हॉल मध्ये संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था…

Read More

विश्व वारकरी संघ,पंढरपूर संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी विजय राणे

⚡कणकवली ता.११-: विश्व वारकरी संघ,पंढरपूर या संघाच्या कोकण विभागीय सचिवपदी कणकवली तालुक्यातील कासार्डे-दाबवाडी येथील ह.भ.प.विजय बाळकृष्ण राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय राणे हे कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या याराना मित्र परिवाराचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.

Read More

बांदा शहरात युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या…

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील गवळीटेम्ब येथील शिवराम दत्ताराम चव्हाण (वय २४) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु…

Read More

मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.११-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था संचलित मालवणी बझार मालवणतर्फे आयोजित मिरची महोत्सवाचा आज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रताप सहदेव बागवे, संचालक मंडळ सदस्य, सभासद, कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या मिरची महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या मिरची महोत्सवात उच्च प्रतीची बॅडगी मिरची, काश्मिरी मिरची, गुंटुर मिरची अशा विविध…

Read More

पर्यटकांना सौजण्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्या

पालकमंत्री चव्हाण यांच्या पोलीस दलाला सूचना ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल. अशी अपेक्षा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक…

Read More

मोती तलावातील गाळ काढून मिळावा…

संजू परब यांची पालकमंत्र्याकडे मागणी; तातडीने लक्ष घाला पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना.. ⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील मोती तलावातील गाळ काढून मिळावा आशी मागणी आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. दरम्यान मंत्री चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सूचना करत संदर्भात तातडीने लक्ष घाला असे सांगितले.

Read More

मठ सातेरी, परिवार देवतांच्या पाषाणाचे आगमन

⚡वेंगुर्ला ता.११-: मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठान २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार असून त्यासाठीची नविन पाषाणे भाविकांच्या अमाप उत्साहात रविवार दि. ९ एप्रिल रोजी मठ-कुडाळ तिठा ते मठ सातेरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूकीने वाजत गाजत आणण्यात आली.

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे बांधणार स्वखर्चातून गणेशकोंड….

भुमीपुजनाने कामांची सुरवात; ग्रामस्थांमधून समाधान.. ⚡सावंतवाडी ता.११-: वेत्ये खांबलवाडी येथे सरपंच गुणाजी गावडे त्यांच्या हस्ते गणेश कोंड कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सरपंच श्री गावडे यांनी स्वखर्चातून हे काम हाती घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थातूनही समाधान व्यक्त होत आहे. वेत्ये खांबलवाडी याठिकाणी गणपती विसर्जनाची असलेली समस्या लक्षात घेत सरपंच श्री गावडे यांनी तेथील ग्रामस्थांना हा प्रश्न सोडवण्याचा…

Read More

गाबीत महोत्सवात ‘सागरी सुंदरी’ स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.११-: अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवात दि. २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सागरी सुंदरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गाबीत समाजातील १८ ते ३५ वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिला सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा पारंपरिक वेशभूषा फेरी, पाश्चिमात्य…

Read More
You cannot copy content of this page