सावंतवाडी शहरांमध्ये शहर चौकी कार्यान्वित करावी…

ॲड. संजू शिरोडकर ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी…

⚡सावंतवाडी ता.११-: शहर दिवसे दिवस विस्तारित होत असून शहराची लोकसंख्या वाढत आहे त्या कारणास्तव शहरांमध्ये मध्यवर्ती शहर पोलीस चौकी चालू करा याबाबतचे निवेदन माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली मागणी

दरम्यान सध्यास्थितीत चितारआळी उभा बाजार येथे पोलीस ठाणे असलेली जागा तशीच आहे व.या ठिकाणी शहर पोलीस चौकी सुरू करावी जेणेकरून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एसटी बस स्टॅन्ड, उभा बाजार बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ, माठेवाडा, सबनीस वाडा, वैश्य वाडा, बाहेरचा वाडा, भटवाडी भागांसाठी सदरची पोलीस चौकी महत्त्वाची तसेच उपयोगी ठरेल.

तसेच पोलिसांची गस्त राहिल्यास चोरी तसेच गुन्हांचे प्रमाण कमी होऊन लोकांनाही तक्रार करण्यासाठी सोयीचे मध्यवर्ती ठिकाण उपलब्ध होईल.याच भागामध्ये सुवर्ण व्यवसायिकांची बाजारपेठ देखील आहे त्यांच्यासाठी देखील फार उपयुक्त असे पोलीस ठाणे ठरेल.सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी उपलब्ध आहेत त्यातील काही सहाय्यक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती या शहर पोलीस चौकीमध्ये केल्यास सावंतवाडी मधील जनतेच्या मोठा फायदा होऊ शकेल असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, ॲड. परिमल नाईक, ॲड. अनिल निरावडेकर, सराफ सुवर्णकार जिल्हाध्यक्ष श्रीपाद चोडणकर,मनोज नाईक,उदय नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page