Headlines

मालवणात उद्या भव्य दिव्य शोभायात्रा

बार्देश गोवा येथील पारंपरिक सादरीकरणातील भन्नाट रोंबाट नृत्य खास आकर्षण ⚡मालवण ता.२१-: गुढीपाडवा नववर्ष निमित्ताने मालवण वासियांच्या वतीने बुधवार २२ मार्च सायंकाळी ४:३० वाजता हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी प्रतिवर्षी प्रमाणे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शोभायात्रेत बार्देश गोवा येथील पारंपरिक सादरीकरणातील भन्नाट रोंबाट नृत्य खास आकर्षण असणार आहे. ढोल ताश्यांचा गजर, घोडे, चित्ररथ, विविध…

Read More

कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्थ मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने बुधवारी २२ मार्च (गुढीपाडवा) पासून श्री रामनवमी उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून ते गुरुवार दि. ३० मार्च रामनवमी पर्यंत श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. बुधवार २२ मार्च…

Read More

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी 23रोजी प्रकट दिन सोहळा

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात गुरुवार .23 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे ‌यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी पाच वाजता स्वामीना दुग्धा अभिषेक त्यानंतर7वाजता नित्य आरती,12 वाजता महाआरती ,12.30 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी सुश्राव्य भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व स्वामी भक्तानी याचा…

Read More

सर्जेकोट येथे २४ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.२१-: सर्जेकोट पिरावाडी येथे दि. २४ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. ७ वा. मच्छीमार बांधवांतर्फे सत्यनारायण महापूजा, ७ ते ९ संगीत भजन, रात्री १०.३० वा. संत बाळूमामा कलामंच, मालवण यांचा ‘नवतरंग’ हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

नाभिक महामंडळ मालवणची २६ रोजी बैठक

⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र नाभिक महामंडळ मालवण तालुका नाभिक संघटनेची बैठक दि. २७ रोजी भैरवी देवालय मालवण येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण, जिल्हा अध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण तालुका महिला अध्यक्ष दीपा शिंदे, सर्व तालुका कार्यकारिणी, विभाग प्रमुख, गट प्रमुख, पदाधिकारी,…

Read More

भगवा चषक स्पर्धेमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले – हरी खोबरेकर

⚡मालवण ता.२१-: क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा केवळ आपणच घेऊ शकतो असे काहींना वाटते, मात्र आम्हीही भव्य दिव्य अशी भगवा चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून ती सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने यशस्वी केली. या स्पर्धेमुळे भगवे वातावरण निर्माण होऊन शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना…

Read More

क्रिकेट मॅचसाठी विशाल सेवा फाऊंडेशन कडून आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव येथील युवकांनी भरवलेल्या क्रिकेट मॅच साठी विशालसेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी युवकांनी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपा युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचे आभार व्यक्त केले.

Read More

भव्य सायकल उत्सव

🚲🛴 दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त … 🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲 🚴🏻‍♀️ मे. पेडणेकर सायकल कंपनी 🚴🏻‍♂️ 🥰 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !! 🥰 🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️ 🥳खास आपल्या सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा🥳 🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️ 🚲🚴🏻‍♂️🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♂️🚲 सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील 🚲 सर्वात विश्वसनीय दालन🚴🏻‍♀️ 🚲 मे. पेडणेकर सायकल…

Read More

वेत्येत आंबा – काजू बागेला आग ;

सायंकाळची घटना; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; ⚡सावंतवाडी ता.२१-: वेत्ये येथील काजू व आंबा बागायतीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला देखील पाचरण केले. घटनास्थळी बंब देखील दाखल झाला. आग विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन लागल्याचं प्राथमिक अंदाज असून यात तीन…

Read More

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले.राजा शिवाजी चौक या मंडळातर्फे दरवर्षी गवळी तिठा येथे गुढीपाडव्या निमित्त पूजेचे आयोजन केले जाते तसेच कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते त्या पार्श्वभूमी विशाल परब यांनी आपल्या फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक मदत केली आहे.

Read More
You cannot copy content of this page