⚡मालवण ता.०५-: नांदरुख पटेलवाडी येथील श्री महापुरुष देवालय येथे ६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११. ३० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ५ वा. संगीत खुर्ची व फनी गेम्स, सायंकाळी ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ वा. स्थानिक मंडळांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत,
तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पटेलवाडी विकास मंडळ, नांदरुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
