सावंतवाडी पोल दुरुस्तीसाठी सोमवारी वीज पुरवठा राहणार काही काळ राहणार खंडित…

⚡सावंतवाडी ता.०६-: वीज महावितरण कंपनीच्या लोखंडी गंजलेले पोल बदलण्याच्या कामासाठी शहरातील काही काळ खंडित राहणार आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

याबाबत सोमवार आठ मे रोजी
सकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 ह्या वेळेत सावंतवाडी बाजारपेठ येथील मे. ईगल स्टोअर जवळील उच्चदाब वहिनीचा लोखंडी गंजलेला पोल बदलण्याचे नियोजन वीज महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. तरी सदर काम करते वेळी सावंतवाडी बाजारपेठ (गांधीचौक, विठ्ठल मंदिर परिसर, नगरपरिषद परिसर, जयप्रकाश चौक ) वसंत प्लाझा भाट बिल्डिंग, दिवाकर/दुर्वांकुर बिल्डिंग येथील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. तरी सदर भागातील ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे. असे आवाहन महावितरण उपविभाग सावंतवाडी यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे

You cannot copy content of this page