दोडामार्गात क्रिकेट स्पर्धेचा अनोखा शुभारंभ..
⚡दोडामार्ग ता.२२-:
क्रीडा आणि विचार यांचा संगम घडवून आणत येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मैदानावर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांसमवेत थेट नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.
या उपक्रमातून खेळाडूंना प्रेरणादायी विचार ऐकवण्याबरोबरच राष्ट्रहित आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
गावडेवाडी बाजारपेठ प्रीमियर लीग अंतर्गत पर्व – ३ रे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संतोष दिनकर नानचे मित्रमंडळ, दोडामार्ग यांचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रथम पारितोषिक: रु. १०,०००/- व चषक
द्वितीय पारितोषिक: रु. ७,०००/- व चषक
तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर आणि मालिकावीर यांनाही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड, धाटवाडी रोड, दोडामार्ग येथे होत असून शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
क्रीडांगणावर प्रेरणादायी विचारांचा समावेश करत समाजजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
