विकास गावकर यांची माहीती; 11ते 21मे पर्यत विविध कार्यक्रम
⚡सावंतवाडी ता.०६-: कोकणातील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023” हा सावंतवाडी ऐतिहासिक शहरात जिमखाना मैदान येते दिनांक 11 मे ते दिनांक 21 मे 2023 या कालावधीत होत आहे हा महोत्सव म्हणजे सावंतवाडी वासियांसाठी एक पर्वणी आहे अशी माहीती कोकण नाऊ चे विकास गावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कोकण नाऊ चैनल वर्षभरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतं त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी वासियांचा आनंद द्विगुणीत करण्याच्या हेतूने या भव्य दिव्य महोत्सवाच आयोजन करण्यात आलेल आहे. या महोत्सवामध्ये सुमारे 200 हून अधिक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहेत त्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून होणारा ऑटो एक्स्पो अर्थातच या महोत्सवांमध्ये विविध कंपन्यांचे टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांचे। प्रदर्शन आणि विक्री देखील असणार आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात होणार आहेत. तसेच देश-परदेशीय खाद्यपदार्थाची प्रदर्शन तसेच विक्री देखील या महोत्सवाचं आकर्षण ठरेल. या महोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनासाठी “मनोरंजन नगरी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेल आहे. तसेच विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील या पर्यटन महोत्सवामध्ये अर्थातच “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023 मध्ये असणार आहे. यामध्ये खास महिलांसाठी खेळ पैठणीचा, तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सिंधुदुर्गातील गायक स्पर्धकांसाठी “आवाज सिंधुदुर्गचा” ही गायन स्पर्धा, तसेच ब्युटी कॉन्टेस्ट साठी “मिस सिंधुदुर्ग स्पर्धा”, शहरातील डान्स अकॅडमीचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ऑर्केस्ट्रा व विशेष म्हणजे तालुक्यातील विविध लोक कलाकारांना देखील कोकण नाऊच्या व्यासपीठावरती आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे. या
