बांदा पानवळ येथील मोरी पूलालगतचा भराव खचल्याने रस्ता धोकादायक
⚡बांदा ता.१३-: बांदा – दोडामार्ग राज्यमार्गावर बांदा पानवळ येथील मोरी पूलालगतचा मातीचा भराव खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी रस्त्यालगत खोदाई केल्याने धोका वाढला आहे. एमएनजीएल कंपनीच्या खोदाई कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यालगतच…
