नेरूर देऊळवाडा गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी द्या…

शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे रुपेश पावसकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

⚡कुडाळ ता.१३-; नेरूर देऊळवाडा हा कुडाळ तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा गाव आहे. त्यामुळे नागरिकांची दररोजची महसूल विषयक कामे मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, पूर्ण वेळ तलाठी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते.


सदर गैरसोय टाळण्यासाठी नेरूर देऊळवाडा गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी मिळावा, अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ओबीसी सेल अध्यक्ष रुपेश पावसकर यांनी कुडाळ तहसीलदार यांना दिले. यावेळी ऋतुजा खडपकर, रूपेश वाडयेकर, मंगेश बांदेकर, रुपेश खडपकर, संतोष म्हापणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page