नितेश राणे यांनी राज्यात बोंब मारत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील समस्येवर लक्ष द्यावे…

सुशांत नाईक यांची टीका: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे आरोग्य विभागाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी गुरुवारी भेट दिली.यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला.रुग्णालयात असलेल्या समस्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.नंतर सुशांत नाईक यांनी राज्यात बोंब मारत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील समस्येवर आम नितेश राणेंनी लक्ष द्यावे असी टिका केली.

नाईक यांनी आढावा घेत असताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की,रुग्णालयात शौचालयांना कड्या नाहीत,कफ सिरप उपलब्ध नाही,पगार वेळेवर होत नाही,रक्त तपासणीची अद्यावत मशनरी आहे परंतू आर्थिंग व्यवस्था नसल्याने ती मशीन धूळ खात आहे.कर्मचारी वर्गाच्या रिक्त जागा भरल्या नाहीत.अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. याबाबत आपण आवाज उठवू असं नाईक यांनी सांगितले.

पत्रकराशी बोलताना नाईक म्हणाले ज्या रुग्ण समितीचे अध्यक्ष आम नितेश राणे आहेत तर त्यांनी एक वर्षात सभा घेतली नाही.राज्यात बोंब मारत फिरण्या पेक्षा‌ आपले मतदार संघात लक्ष द्यावे असी विनंती केली.

यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, सरपंच विलास नावळे, जितेंद्र तळेकर, सुनिल कांबळे, नगरसेवक मनोज सावंत, सुनील रावराणे, रोहीत पावसकर,अतुल सरवटे, गणेश पवार,नितेश शेलार,यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

You cannot copy content of this page