औदुंबर सेवा ट्रस्टकडून देण्यात आला मदतीचा हात
⚡वैभववाडी ता.१३ संजय शेळके-: नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.त्याच्यावरील वेळीच उपचार व्हावेत म्हणून औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्याकडून ५१,०००/- (ऐक्कावन्न हजार ) चा धनादेश त्याचे वडील प्रशांत राणे यांच्याकडे उपचारासाठी मदतीचा हात म्हणून देण्यात आला आहे.
नाधवडे येथील औदुंबर सेवा ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गावात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.यात प्रामुख्यांने सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक ,आरोग्यविषयक उपक्रमावर भर दिला जातो.
प्रशांत प्रकाश राणे यांचा मुलगा कु.जय प्रशांत राणे वय वर्ष ३ हा बल्ड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असुन त्यांच्यावरती सध्या मुंबई येथील केईम रुग्णालयात वैद्यकिय उपचार सुरू असुन त्यांच्या उपचारार्थ जवळ जवळ ५०००००/- (पाच लाख ) पर्यत खर्चाची गरज असून प्रशांत राणे यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यांना जयवरती एवढा मोठा खर्च करणे शक्य नाही.यासाठी त्यांच्या मदतीला धावून आली आहे.औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांनी त्यांना मदतीचा हात म्हणुन ५१,०००/- (ऐक्कावन्न हजार ) चा धनादेश प्रशांत राणे यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी औदुंबर सेवा ट्रस्टचे सचिव दिपक पावसकर,खजिनदार रुपेश कुडतरकर,प्रफुल घाडी,योगेश शेट्ये,प्रविण गुरव,कृष्णा नारकर,योगेश घाडी उपस्तित होते.
औदुंबर सेवा ट्रस्ट दरवर्षी वैद्यकीय उपचारार्थ ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे व ज्यांना वेद्यकिय उपचार घेणे शक्य नाही अशा गरजवंतांना नेहमीच मदतीचा हात पुढे करत असते.
