दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक पाऊण तासाने पूर्ववत
⚡दोडामार्ग,ता.१३-: दोडामार्ग तिलारी मार्गावर आंबेली कोनाळकरवाडी येथे विद्युत भारीत वीज वाहिनी तुटून पडल्याने पाऊण तास त्या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विद्युत वाहिनी सायंकाळी सातच्या दरम्यान तुटून पडली होती . ती पडल्याचे वेळीच वाहनचालकांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला.दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .दरम्यान,वाहिनी तुटून पडल्याची माहिती संबंधित वायरमनला दिल्यानंतर त्यांनी येऊन वीजपुरवठा खंडित केला.त्यांनतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
