जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी वैभवाडी माजी सभापती  मीना बोडके यांची निवड

⚡वैभववाडी ता.१३ संजय शेळके-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी वैभवाडी माजी सभापती  मीना बोडके यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील ,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, यांच्या सूचनेनुसार त्यांची ही निवड करण्यात आली आहे.


   मिना बोडके या काॕग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी याअगोदर महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या जिल्हा सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
    अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आदरणीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेले काँग्रेस पक्षाला जनाधार प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करु असे निवडीनंतर बोडके यांनी सांगितले.

फोटो-

You cannot copy content of this page