वर्षा किनळेकर यांनी नगर वाचनालयाला दिली लाखाची देणगी

विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या देण्यात येणार पारितोषिक

⚡वेंगुर्ला ता.१३-: शिक्षण, कला व क्रीडा या क्षेत्रामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विशेष प्राविण्य संपादन करणा-या विद्यार्थी किवा विद्यार्थीनीला दरवर्षी पारितोषिक देण्यासाठी श्रीमती वर्षा विश्राम किनळेकर यांनी १ लाख रूपयांची देणगी वेंगुर्ला नगरवाचनालय या संस्थेकडे ठेव म्हणून ठेवली आहे.

  या रक्कमेच्या व्याजातून एक किवा दोन विद्यार्थ्यांसाठी कै. रामचंद्र विश्राम किनळेकर व कै.मंदाकिनी रामचंद्र किनळेकर स्मृती पारितोषिके सन २०२३-२४ या वर्षापासून देण्यात येणार आहेत. या देणगीसाठी रमण किनळेकर यांनी सहकार्य केले. कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी वर्षा किनळेकर यांचे आभार मानले.
You cannot copy content of this page