एलइडी सीसीटीव्ही स्क्रीन आणि सीसीटीव्ही डोम कॅमेरे लंपास
⚡दोडामार्ग,ता.१३-: साटेली भेडशी येथील श्री शांतादुर्गा, पुरमार मंदिरातील एलइडी सीसीटीव्ही स्क्रीन आणि 20 मीटर रेंजचे सीसीटीव्ही डोम कॅमेरे अज्ञात चोरटयांनी चोरून नेले.घटना बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.
त्याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी:
मन्दिरात बुधवारी शिवराम सखाराम धर्णे यांनी पूजाअर्चा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करून त्याला कुलूप केलेले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी सातच्या मानाने शिवराम सखाराम धर्णे व तुळशीदास पांडुरंग धर्णे यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा उघडला असता मंदिराच्या उजव्या बाजूस असलेला दरवाजा उघडा दिसला. त्याच्या बाहेरच्या बाजूचे कुलूप तोडून व त्या ठिकाणी लावलेला तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला पाच हजार रुपये किंमतीचा एलइडी सीसीटीव्ही स्क्रीन आणि तीन हजार रुपये किंमतीचे 20 मीटर रेंजचे दोन सीसीटीव्ही डोम कॅमेरे चोरून नेल्याचे लक्षात आले.
त्याची अंदाजे किंमत 8 हजार रुपये एवढी आहे.याप्रकरणी
सदानंद धर्णे यांनी पोलिसात तक्रार दिली.पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
