Headlines

कणकवली तालुक्यात पावसाने केला कहर…

जानवली,गडनदीला पूर;आचरा मार्गावर पाणी;केटी बंधारे झाले ओव्हरफ्लो ⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्याला शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीला पूर आल्याने लगतच्याभागांना पुराचा वेढा पडला. जानवलीनदीला पूर आल्यामुळे आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून…

Read More

शिवसैनिकांसाठी संघर्षाचा काळ असला तरी येणारा काळ उद्धवसाहेबांचा…

प्रवीण पाटकर:युवासेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी घेतली युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक ⚡कणकवली ता.२२-: शिवसैनिकांसाठी हा काळ संघर्षाचा आहे मात्र येणार काळ हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांचा असेल असा आत्मविश्वास युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीणपाटकर यांनी व्यक्त केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी कणकवली विजय भवन येथे कणकवली विधानसभा मतदार संघातील युवासेना…

Read More

शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त डेगवेत विविध रोपांचे वाटप…

⚡दोडामार्ग,ता.२३-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या डेगवेतील कार्यकर्त्यांनी डेगवे गावातील (ता.सावंतवाडी) सर्व शेतकरी बांधवांना नारळ,सुपारी आणि काजू कलमाच्या रोपांचे वाटप शुक्रवारी केले आहे.रोपे वाटपाचा कार्यक्रम श्री स्थापेश्वर मंदिराजवळ झाला. यावेळी डेगवे आंबेखणवाडी,जांभळवाडी,फणसवाडी,बाजारवाडी,मोयझरवाडी,वराडकरवाडी,मिरेखणवाडीतील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.या कार्यक्रमात पावसाळ्यातील रानभाज्या व त्याचे फायदे या विषयावर दापोली कृषी विद्यापिठामध्ये प्रशिक्षण घेणारे…

Read More

आंबोलीत पट्टेरी वाघांचे वास्तव्य

गुरांची केली शिकार:रस्ता ओलांडताना अनेकांना झाले दर्शन आंबोली,ता.२२: पश्चिम घाटातील बायो डायव्हर्सिटी असलेल्या आंबोलीत सध्या पट्टेरी वाघ मुक्तपणे फिरत आहे.परिसरात त्याने आठवड्यात चौकुळ मधील काहींची गुरांची शिकार केली आहे.घाटात देखील बऱ्याचवेळा रस्ता ओलांडताना अनेक वाहतुकदारांना दृष्टीस पडतो. आंबोली परिसरातील वनात पट्टेरी वाघ साधारण जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबर च्या दरम्यान गुरांची शिकार करत असल्याचे दिसून येते.गेल्या…

Read More

तिलारी धरणातील पाणी अखेर तिलारी नदीत सोडले

नदीकाठावरील लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ⚡दोडामार्ग ता.२२-: तिलारी धरणाचे पाणी अखेर खळग्यातील धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्यात सोडण्यात आले. खळग्यातील धरणातून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याला वाट करून देण्यात आली.सुरवातीला धरणातून ४ हजार ५५६ लिटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे आता तिलारी नदीची पाणी पातळी वाढणार आहे.तिलारी नदीकाठावरील दोडामार्ग…

Read More

मोरगाव येथे घरावर झाड पडून नुकसान

पिरणकर कुटुंबीयासमोर राहायचे कुठे असा प्रश्न;अर्थसाह्याची मागणी ⚡दोडामार्ग,ता.२२-:मोरगाव टाकवाडी येथील रमेश कृष्णा पिरणकर यांच्या घरावर अतिवृष्टीमुळे झाड उन्मळून पडल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. साहजिकच भर पावसात आता राहायचे कुठे असा प्रश्न श्री. पिरणकर आणि कुटुंबीयांना पडला आहे. आपदग्रस्त कुटुंबीय भयभीत झाले आहे.शेजाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला असला तरी महसूल प्रशासनाने तत्काळ पाहणी…

Read More

ओवळीये गावचे मानकरी चंद्रकांत सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

⚡सावंतवाडी ता.२२-: ओवळीये गावचे मानकरी कै चंद्रकांत कृष्णा सावंत रा. ओवळीये मधलीवाडी यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झालं. त्याच्या पश्चताप तीन मुलगे पुतणे, तीन सुने नातू नातवंड असा परिवार आहे. गेले अनेक वर्ष गावच्या सामाजिक धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये गावच्या विकासाला त्यांनी हातभार लावला आहे. त्यांच्या जाण्याने गावात शोककाळा पसरली आहे

Read More

पाय घसरून घळणीत पडल्याने कामगाराचा मृत्यू…

बांदा येथील घटना: पोलीस घटनास्थळी दाखल ⚡बांदा ता.२२-: मुंबई गोवा महामार्गावर पहिल्या पुलानजिक पाय घसरून खाली घळणीत पडल्याने कामगाराच्या मृत्यू झाला आहे. हि घटना आज सकाळी उघडकीस आली. हा कामगार लगतच्या धाब्यावर काम करत होता. हि माहिती उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली. बांदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Read More

माठेवाडा- झिरंगरोड येथे विद्युत तारांवर भेडले माड पडण्याची शक्यता…

दुर्दैवी घटना घडल्यास वीज वितरण जबाबदार:भाजप युवा शहराध्यक्ष संदेश टेमकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील माठेवाडा झिरंगरोड भाईजाण मंडम शेजारी बेलडे माडाचे झाड कोसळण्याच्या स्थितीत असून सध्या ते विद्युत तारांमुळे अडकले आहे. मात्र ते केव्हाही पडून एखादी दुर्घटना होऊ शकते. याबाबत वीज वितरण चे गेले चार दिवस लक्ष वेधून देखील अद्याप देखील त्यांनी कोणतीही दखल…

Read More

नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी काँग्रेस सक्रिय…

माडखोल येथील झाड केले बाजूला:तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि सहकारी उतरले मैदानात सावंतवाडीतालुक्यात गेले चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः  विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तालुक्यात घडलेल्या पडझडीच्या घटनेत मदत करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र सज्ज झाले असून अनेक ठिकाणी पाहणी करत मदतकार्य करीत आहेत. माडखोल येथील पाण्याच्या प्रवाहात कोसळलेल्या…

Read More
You cannot copy content of this page