दुर्दैवी घटना घडल्यास वीज वितरण जबाबदार:भाजप युवा शहराध्यक्ष संदेश टेमकर यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२२-: येथील माठेवाडा झिरंगरोड भाईजाण मंडम शेजारी बेलडे माडाचे झाड कोसळण्याच्या स्थितीत असून सध्या ते विद्युत तारांमुळे अडकले आहे. मात्र ते केव्हाही पडून एखादी दुर्घटना होऊ शकते. याबाबत वीज वितरण चे गेले चार दिवस लक्ष वेधून देखील अद्याप देखील त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे एखादी जीवित हानी झाल्यास याला वीज अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा भाजपचे युवा शहराध्यक्ष संदेश टेमकर यांनी दिला आहे.
