माडखोल येथील झाड केले बाजूला:तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि सहकारी उतरले मैदानात
सावंतवाडी
तालुक्यात गेले चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तालुक्यात घडलेल्या पडझडीच्या घटनेत मदत करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र सज्ज झाले असून अनेक ठिकाणी पाहणी करत मदतकार्य करीत आहेत. माडखोल येथील पाण्याच्या प्रवाहात कोसळलेल्या झाडामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्या ठिकाणी जाऊन तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मदत कार्यात उतरून टी पाण्याचा प्रवाह जाण्याची वाट मोकळी करून दिली. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्या ठिकाणी देखील महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जात पाहणी करत जे जे सहकार्य लागल ते काँग्रेसच्या माध्यमातून करू असे आश्वासन देखील त्यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी बबन डिसोजा,मिनिंग गोम्स, पॉल गोम्स ,संजय लाड,गोविंद फर्नांडिस ,विनोद मल्हार ,आदींनी सहभाग घेतला.
