Headlines

पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता पहिली पसंती फेरी (कॅप राऊंड) 23जुलै पासून…

भोसले पॉलिटेक्निक येथे मोफत प्रवेश सुविधा केंद्र.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पॉलिटेक्निक प्रवेशासाठी संस्था व अभ्यासक्रम निवडण्याची पसंती फेरी (कॅप राऊंड )रविवार, दि.23 जुलै रोजी सुरू होत आहे. दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिता तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून विहित मुदतीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संस्था व अभ्यासक्रम पसंती फेरी 23-26 जुलै या कालावधीत राबवली जाणार आहे. यशवंतराव…

Read More

पर्यटन महासंघाच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना जिल्हास्तरीय पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळा…

⚡मालवण ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून प्रशासकीय पातळीवर त्यांच्या असलेल्या अडचणी मार्गी लावणे तसेच प्रशासकीय पातळीवर रिक्षा व्यावसायिकाना टुरिस्ट गाईड म्हणून मान्यता देणे आणि त्यांना पर्यटकांना आदरतिथ्या विषयी मार्गदर्शन करणेसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचानलाय यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २३ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता हॉटेल चिवला बिच मालवण…

Read More

आपत्कालीन टीमसाठी मोफत साहीत्य देणार …

विशाल परब यांचे आश्वासन; संपर्क साधण्याचे आवाहन ⚡वेंगुर्ला ता.२१-; सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.यात मोठ्या प्रमाणात पाणी घुसून हाहाकार माजला आहे.काही ठिकाणी वित्तहानी झाली आहे.तर काही ठिकाणी पाण्यातून जाण्याचे धाडस केले जाते.परिणामी पुराच्या पाण्यातून वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत.यावेळी अनेक तरूण धाडस करून पुरातून वाहून जाणाऱ्यांना जीव धोक्यात घालून वाचवतात.या सर्व…

Read More

दोडामार्गात पावसाची जोरदार बॅटिंग…

तिसरा दिवस: नदी नाले, धरणे तुडुंब,तिलारी वीजघर मार्गावर पाणी ⚡दोडामार्ग,ता.२१-: तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.कधी थोडी विश्रांती घेवून तर कधी संततधार पाऊस कोसळत आहे.नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.तालुक्यातील तिलारी धरण आणि तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.तिलारी धरणात १०५ मीटर पाणीसाठा आहे तर उन्नेयी बंधाऱ्यात पाणी क्षमतेपेक्षा अधिक…

Read More

बांदा नट वाचनालयात बालकुमार ज्ञानकांपरा स्थापन…

एस. आर. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन… बांदा/प्रतिनिधीशालेय मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्थेची संस्कृती जोपासण्यासाठी नट वाचनालय बांदा येथे बालकुमार ज्ञानकांपरा स्थापन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत व शालेय मुलांच्या उपस्थितीत समई प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी वाचाल तर वाचाल या उद्देशाने बालवाचक मेळावा घेण्यात आला. या…

Read More

भोसले फार्मसीला ‘एक्सलंट’ मानांकन…

गुणवत्ता मूल्यांकन : अध्यापन पद्धत, शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर…. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये ‘एक्सलंट’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल, राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम…

Read More

तिलारी धरणाचे पाणी उद्यापासून नदीत सोडणार

पाणीपातळी वाढल्याने निर्णय;काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन ⚡दोडामार्ग ता.२१-: तिलारी मुख्य धरणाचे पाणी पुच्छ कालव्यादवारे उद्यापासून तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे.तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली आहे.त्यामुळे तिलारी पाटबंधारे विभागाने मुख्य धरणातील पाणी खळगग्यातील धरणाच्या पुच्छ कालव्यादवारे तिलारी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तिलारी शीर्षकामे उपविभाग क्र.२ चे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे…

Read More

पालकांनी मुलांवर अपेक्षेचे ओझे लादू नये…

विजय चव्हाण :चर्मकार समाज उन्नती मंडळ तळेरे-कासार्डे प्रभाग विद्यार्थी गुणगौरव ⚡कणकवली ता.२१-:मुलांना काय वाटतं हे महत्त्वाचे आहे, मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर चांगला माणूस बनवा,पालकांनी मुलांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये,त्या ओझ्याखाली लहान मुलांचा अक्षरशः जीव गुदमरून जातो आहे, इंग्रजी शाळांचा हट्ट पालकांनी मुळीच धरू नये,मराठी शाळेतूनच खऱ्या अर्थांने मुलांना योग्य संस्कारासह जीवन जगण्याचे शिक्षण…

Read More

प्राथ.आरोग्य केंद्रांना डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.२१-: जिल्ह्यामधील प्राथ.आरोग्य केंद्रांना तात्पुरत्या स्वरुपात डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रेयांनी केली.यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उद्योजक किरण सामंत, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश…

Read More

नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे…

जिल्हाधिकारी के मजुलक्ष्मी ; येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून सुचना.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्गात येणाऱ्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून तशाप्रकारे अलर्ट करण्यात आले असून नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले. तर आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य वेळीच व्हावे यासाठी ग्रामपंचायत ते…

Read More
You cannot copy content of this page