⚡मालवण ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून प्रशासकीय पातळीवर त्यांच्या असलेल्या अडचणी मार्गी लावणे तसेच प्रशासकीय पातळीवर रिक्षा व्यावसायिकाना टुरिस्ट गाईड म्हणून मान्यता देणे आणि त्यांना पर्यटकांना आदरतिथ्या विषयी मार्गदर्शन करणेसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचानलाय यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २३ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता हॉटेल चिवला बिच मालवण येथे पर्यटक आदरतिथ्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी जिह्यातील रिक्षा प्रवासी चालक ,मालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे .
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सागरी पर्यटना सोबत जिल्ह्यातील ऍग्रो ,हिस्ट्री ,कल्चर,मेडिकल टुरिझम ,कातळशिल्प पर्यटन,साहसी पर्यटन फूड टुरिझम क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे .सिंधुदुर्ग जिल्हातील ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पर्यटन ग्राम समिती गठीत होत आहेत पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्ष प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यांत पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर पर्यटन वाढींसाठी नियोजित कार्यास सुरुवात झाली आहे परंतु पर्यटन व्यवसायास खऱ्या अर्थाने समन्वयक असलेले रिक्षा व्यावसायिक मात्र उपेक्षित आहेत त्या व्यवसायिकांना पर्यटन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून प्रशासकीय पातळीवर त्यांच्या असलेल्या अडचणी त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी या पर्यटक आदरतिथ्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी पर्यटन संचालनालय कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.ज्या माध्यमातून ग्राम स्तरावर पर्यटन वाढीसाठी नियोजित कामाची सुरवात होईल असे श्री मोंडकर यांनी सांगितले
