एस. आर. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन…
बांदा/प्रतिनिधी
शालेय मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्थेची संस्कृती जोपासण्यासाठी नट वाचनालय बांदा येथे बालकुमार ज्ञानकांपरा स्थापन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत व शालेय मुलांच्या उपस्थितीत समई प्रज्वलीत करून करण्यात आले.
यावेळी वाचाल तर वाचाल या उद्देशाने बालवाचक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात इयत्ता चौथी ते सातवीच्या ७५ मुलांनी सहभाग घेतला. यावेळी मुलांनी विविध प्रकारची गोष्टींची पुस्तक वाचली. तसंच त्या पुस्तकांतील आशय वहीत लिहुन घेतला.
पुस्तके वाचल्याने आपल्या जिवनात किती बदल होतो, वाचनाचे महत्व अनंत भाटे यांनी मुलांना पटवून दिले. आपला आनंद व्यक्त करताना मुलांनी वेगवेगळ्या कथा सांगितल्या. हा कार्यक्रम वाचनालयात नुकताच संपन्न झाला. यावेळी बांदा केंद्र शाळेची विद्यार्थिनी पुर्वा हेमंत मोर्ये हिची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने तिचे गुलाबपुष्प देवुन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह हेमंत मोर्य, संचालक निलेश मोरजकर, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर, शिक्षक जे. डी. पाटील, उपशिक्षिका सौ. उर्मिला मोर्य, सौ. शुभेच्छा सावंत, सौ. स्नेहा घाडी, वाचनालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वाचनालयाचे कार्यवाह राकेश केसरकर यांनी केले.
