प्राथ.आरोग्य केंद्रांना डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष..

⚡कणकवली ता.२१-: जिल्ह्यामधील प्राथ.आरोग्य केंद्रांना तात्पुरत्या स्वरुपात डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे
यांनी केली.
यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उद्योजक किरण सामंत, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील उपस्थित होते.

नामदार रवींद्र चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे म्हणतात,सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ३८ ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथ. आरोग्य केंद्र असून,त्यापैकी काही आरोग्य केंद्र हि सुसज्ज इमारत व सोयी सुविधायुक्त आहेत. तथापि काही आरोग्य केंद्रांची कर्मचारी निवासस्थाने व आरोग्य केंद्र किरकोळ इमारत दुरुस्ती यासारखी महत्वाची कामे करण्यासाठी प्राधाण्याने निधी उपलब्ध करून मिळावा.


एक विशेषबाब म्हणून जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीसाठी यामध्ये प्राधान्याने स्वच्छता गृह त्यांचे दरवाजा, खिडक्या, पाईपलाईन, या अनुषंगी तत्सम कामांसाठी एक प्रति आरोग्य केंद्रास २ ते ३ लाख प्रमाणे जिल्हा नियोजन समितीमधून विशेष बाब म्हणून तरतूद होऊन अनुदान मिळण्यास विनंती आहे. सदर अनुदान हे त्या त्या आरोग्य केंद्रास अधिनिष्ठ वर्ग केल्यास त्यांना त्यांच्या स्तरावर वैद्यकीय सोयी सुविधा लोकांच्या व कर्मचाऱ्याच्या गरजेनुसार देणे शक्य होईल.असे संजय आग्रे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page