गुरांची केली शिकार:रस्ता ओलांडताना अनेकांना झाले दर्शन
आंबोली,ता.२२: पश्चिम घाटातील बायो डायव्हर्सिटी असलेल्या आंबोलीत सध्या पट्टेरी वाघ मुक्तपणे फिरत आहे.परिसरात त्याने आठवड्यात चौकुळ मधील काहींची गुरांची शिकार केली आहे.घाटात देखील बऱ्याचवेळा रस्ता ओलांडताना अनेक वाहतुकदारांना दृष्टीस पडतो.
आंबोली परिसरातील वनात पट्टेरी वाघ साधारण जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबर च्या दरम्यान गुरांची शिकार करत असल्याचे दिसून येते.गेल्या काही वर्षात वनविभागाने याच महिन्यात साधारणतः पंचनामे केल्याचे दिसून येते.गेल्या पंधरावड्यात त्याने चौकुळ नेनेवाडी तसेच केगदवाडी येथील बैल,गाय, म्हैशी मारून ओढून नेऊन फस्त केल्या आहेत.त्याचे पंचनामे देखील पशुसंवर्धन आणि वनखात्याने केले आहेत.आठ दिवसापूर्वी चौकुळ च्या गजानन गावडे(गावडेवाडी)याना घाटात रस्ता ओलांडताना दृष्टीस पडला होता. तर अनेकांना धबधब्याकडून खाली रस्त्यात दृष्टीस पडतो. तर कोही जणांना दोन वाघ जोडीने देखील दिसले आहेत.गेल्या वर्षी हिरण्यकेशी येथे गणपत राऊत यांच्या गायीची शिकार करतानाचा वाघाचा फोटो देखील वायरल झाला होता.सध्या पारगड येथे एक विडिओ पर्यटकांनी पट्टेरी वाघाचा शूट करून समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. चौकुळ च्या तसेच आंबोलीच्या जंगल पट्ट्यात पट्टेरी वाघाचे मुक्तपणे संचार आहे.
