पिरणकर कुटुंबीयासमोर राहायचे कुठे असा प्रश्न;अर्थसाह्याची मागणी
⚡दोडामार्ग,ता.२२-:मोरगाव टाकवाडी येथील रमेश कृष्णा पिरणकर यांच्या घरावर अतिवृष्टीमुळे झाड उन्मळून पडल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.
साहजिकच भर पावसात आता राहायचे कुठे असा प्रश्न श्री. पिरणकर आणि कुटुंबीयांना पडला आहे. आपदग्रस्त कुटुंबीय भयभीत झाले आहे.शेजाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला असला तरी महसूल प्रशासनाने तत्काळ पाहणी व पंचनामा करून पिरणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
