घाटीवडे येथे दोन एसटींचा अपघात
सुदैवाने प्राणहानी टळली, सात जण जखमी;एसटी चालकावर गुन्हा दाखल ⚡दोडामार्ग ता.०३-:दोडामार्ग वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्या आणि अपघात झाला.त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेर जंगलात गेली आणि आरडाओरड झाली.प्रवाशांनी चालकाच्या दरवाजातून बाहेर उडया टाकल्या.वीजघर गाडीही मागच्या बाजूने गटारात गेली….
