युवराज लखमराजे भोसले यांची
भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड…

⚡सावंतवाडी,ता.०३-: भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबतची घोषणा आज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली. श्री. लखम यांचे काम व संघटना बांधण्याची पद्धत लक्षात घेता त्यांना राज्यस्तरावर जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page