२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर
ओरोस, ता. ७ :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती…
