घारपी येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.२७-: घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २९ रोजी करण्यात आले आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांनी स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. हा पालखी सोहळा दुपारी १२ ते ३ या वेळेत संपन्न होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुका दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती विजय गावकर, समस्त घारपी ग्रामस्थ आणि स्वामी सेवक भक्त मंडळी यांनी केले आहे. यावेळी भजन, नामस्मरण तसेच महाप्रसादाचाही लाभ भक्तांना मिळणार आहे.
तसेच, संध्याकाळी ठीक ८.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ, डोंगरपाल यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार असून, या कार्यक्रमाचाही भाविकांनी लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page