ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचे समर्थक ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश सावंत यांची माघार…

हरकुळ मतदार संघात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का:ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष..

⚡कणकवली ता.२७-: हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघाकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी संतोष कानडे यांनी आज सकाळीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही वेळापूर्वीच माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांचे निकटवर्तीय मंगेश सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तत्पूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी येथील अर्ज मागे घेतला होता. त्यापूर्वी त्यामुळे या मतदारसंघात आता नेमकी कशाप्रकारे लढत होणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यातच ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांच्या भूमिकेकडे आता अवघ्या जिल्ह्याचे

लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page