सोनुर्लीत माऊली देवीच्या दर्शनाने विक्रांत सावंत-सचिन बिर्जें ने महायुती प्रचाराचा केला शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२७-:
माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी सोनुर्ली माऊली देवीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. सोनुर्ली गावाच्या विकासासाठी मतरुपी आशीर्वाद द्या अशी हाक यावेळी विक्रांत सावंत यांनी मारली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघासाठी भाजपा मधून सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माजगाव पंचायत समिती साठी सचिन बिर्जे यांना भाजपा कडून उमेदवारी, दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार घरोघरी जाऊन सुरू केला आहे, तरुण तडफदार सुशिक्षित उमेदवार म्हणून दोन्ही चेहरे भाजपकडून देण्यात आले आहे, या दोघांनाही जनतेमधून प्रचंड आशीर्वाद मिळत असून आज सोनुर्ली गावामध्ये श्रीदेवी माऊली देवीचे दर्शन घेत त्यांनी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी विक्रांत सावंत म्हणाले, जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासह पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषद मतदार संघात जनतेचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे युवाशक्ती आणि जनतेचे आशीर्वाद हीच माझी ताकद असून सर्व मतदार बंधू भगिनींनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतरूपी आशीर्वाद आम्हाला द्या आणि सोनुर्ली गावासह संपूर्ण जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास करण्याची संधी मला द्या आपण दिलेले प्रेम आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही.
तर पंचायत समिती ही गावचा केंद्रबिंदू म्हणून ओळखली जाते गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधी म्हणून मला पंचायत समितीवर निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद मला द्या असे आवाहनही पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी केले. यावेळी गावचे प्रमुख मानकरी बाळा गावकर रमेश गावकर दशरथ गावकर सचिन गावकर, नागेश गावकर,रेश्मा सावंत,सरपंच नारायण हिराप,उपसरपंच भरत गावकर,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर,विष्णू नाईक, विजय पालेकर,प्रवीण गाड,बबली मालपेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संछ्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page