Headlines

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली
नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट

परशुराम उपरकर यांची विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा कणकवली 24 ऑगस्ट (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील हायवेच्या बाबतीतले प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, जिल्ह्यात शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता व त्यातून जनतेची होणारी…

Read More

कुडाळच्या वॉर्ड १५ मधील वीज समस्या नगरसेवक उदय मांजरेकर यांनी लावल्या मार्गी

⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ कुंभारवाडी प्रभागात मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्या भेडसावत होत्या. यामध्ये प्रामुख्याने वॉर्डमध्ये विजेच्या तारा जीर्ण झाल्याने लोंबकळत होत्या. तसेच या वॉर्डमधील विजेचे खांब सुद्धा गंजलेले होते. याबाबत स्थानिक नगरसेवक उदय मांजरेकर यांनी महावितरणकडे याबाबत माहिती देऊन पाठपुरावा केला. याची महावितरणने सुद्धा तत्काळ दखल घेत कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे वॉर्ड १५…

Read More

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी पी.के.चौकेकर यांची निवड…

⚡मालवण ता.२४-: चौके ग्रामपंचायतची नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान उपसरपंच पी.के.चौकेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. चौके गावची ग्रामसभा सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या सभेत गाव तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली. या समितीमध्ये सदस्य म्हणून सरपंच गोपाळ चौकेकर, माजी सरपंच राजन गावडे, ऍड….

Read More

आचरा पंचक्रोशी मर्यादित भव्य राखी बनविणे स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२४-: सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त वायंगणी-चिंदर -त्रिंबक -आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य ” राखी बनविण्याची स्पर्धा “आयोजित केली आहे. यासाठीप्रथम पारितोषिक रुपये 1500/-द्वितीय पारितोषिक – रुपये 1000/-तृतीय पारितोषिक – रुपये 500/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली असूनही स्पर्धा सर्व आबालवृद्धांकरिता विनामूल्य प्रवेश आहे राखी बनवताना एक मोबाईल विडिओ काढून…

Read More

वीज ग्राहक संघटनेची २७ रोजी मालवण तालुका बैठक

⚡मालवण ता.२४-:सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या अंतर्गत महावितरणच्या मालवण उपविभागाची विज ग्राहक समिती स्थापन करण्यासाठी आढावा बैठक रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी मालवण भरड येथील लिलांजली सभागृहात सायं.४ वा. आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटनेशी संलग्न असलेली ‘सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना’…

Read More

संजू परबांनी नौटंकी बंद करावी…

पुंडलिक दळवी; कोरोना काळात व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपची आताची भूमिका ही दुटप्पी भूमिका.. सावंतवाडी : सत्तेत असताना भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांची भुमिका व्यापाऱ्यांच्या विरोधात राहीलेली होती‌. व्यापारी आणि नगरपरिषद असा त्यावेळी संघर्ष शहराने बघितला होता. भाजी मंडईतील व्यापारी वर्गाला गणेशोत्सव पर्यंत मुदत देण्यात यावी हे योग्य आहे. परंतु, कोरोनाकाळात व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपची आताची…

Read More

कणकवली दिवाणी न्यायालय येथे
९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

⚡कणकवली ता.२४-: तालुका विधी सेवा समिती कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय कणकवली येथे शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पक्षकारांच्या हितासाठी ही लोकअदालत होणार आहे. त्यातून त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची दिवाणी, फौजदारी कौटुंबिक व पोटगी इत्यादी प्रकरणे तसेच म.रा. वि.वि. कंपनी, बी.एस.एन.एल, वित्तीय संस्था,…

Read More

शिवसेनेतर्फे कणकवली येथे 27 रोजी जिल्हास्तरीय महिला गट व पुरुष गट नारळ लढविणे स्पर्धा

⚡कणकवली ता.२४-: शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय महिला गट व पुरुष गट नारळ लढविणे स्पर्धा रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक : ५०००/- रुपये,द्वितीय पारितोषिक : ३०००/-,तृतीय पारितोषिक : २०००/- ठेवण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नाव नोंदणी…

Read More

साटेली येथे कारचा अपघात..

चालकाचा ताबा सुटल्याने प्रकार; सुदैवाने चालक बचावला. ⚡सावंतवाडी ता.२४-:चालकाचा ताबा सुटल्याने साटेली येथे कार रस्ता सोडून घळणीत कोसळल्याची घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यात चालक बालबाल बचावला मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोव्याहून आपल्या ताब्यातील कार घेऊन चालक सावंतवाडीच्या दिशेने येत होता यावेळी साटेली येथील तीव्र वळणावर त्याचा कार वरील ताबा सुटला…

Read More

व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यंत बसण्याची मुदत द्या…

संजू परब; व्यापाऱ्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट;विचार करून निर्णय घेऊ मुख्याधिकारी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यंत बसण्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने भाजपने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे.दरम्यान दबाव टाकून व्यापाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न कोणी केल्यास गाठ भाजपची आहे. प्रशासनाने हसण्यावर घेऊ नये असा इशारा माजी नगराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page