व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यंत बसण्याची मुदत द्या…

संजू परब; व्यापाऱ्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट;विचार करून निर्णय घेऊ मुख्याधिकारी..

⚡सावंतवाडी ता.२४-: संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यंत बसण्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने भाजपने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे.दरम्यान दबाव टाकून व्यापाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न कोणी केल्यास गाठ भाजपची आहे. प्रशासनाने हसण्यावर घेऊ नये असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान मुख्याधिकारी आपणावर कोणताही दबाव असल्यास पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी आपण बोलतो असे आश्वासन देखील परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्याशी वेळोवेळी चर्चा करून मुदतवाढ घेतली त्यामुळे आताची त्यांची मागणी लक्षात घेता आपण या संदर्भात विचार करून पुढील भूमिका ठरू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नासिर शेख, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, मनोज नाईक, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page