साटेली येथे कारचा अपघात..

चालकाचा ताबा सुटल्याने प्रकार; सुदैवाने चालक बचावला.

⚡सावंतवाडी ता.२४-:
चालकाचा ताबा सुटल्याने साटेली येथे कार रस्ता सोडून घळणीत कोसळल्याची घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यात चालक बालबाल बचावला मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गोव्याहून आपल्या ताब्यातील कार घेऊन चालक सावंतवाडीच्या दिशेने येत होता यावेळी साटेली येथील तीव्र वळणावर त्याचा कार वरील ताबा सुटला व कार रस्ता सोडून घळणीत कोसळली.

You cannot copy content of this page