पुंडलिक दळवी; कोरोना काळात व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपची आताची भूमिका ही दुटप्पी भूमिका..
सावंतवाडी : सत्तेत असताना भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांची भुमिका व्यापाऱ्यांच्या विरोधात राहीलेली होती. व्यापारी आणि नगरपरिषद असा त्यावेळी संघर्ष शहराने बघितला होता. भाजी मंडईतील व्यापारी वर्गाला गणेशोत्सव पर्यंत मुदत देण्यात यावी हे योग्य आहे. परंतु, कोरोनाकाळात व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपची आताची भुमिका ही दुटप्पी भूमिका आहे.
भाजपचा हा राजकीय स्टंट आहे. नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचेही खटपट सुरू आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले आहे.
