वीज ग्राहक संघटनेची २७ रोजी मालवण तालुका बैठक

⚡मालवण ता.२४-:
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या अंतर्गत महावितरणच्या मालवण उपविभागाची विज ग्राहक समिती स्थापन करण्यासाठी आढावा बैठक रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी मालवण भरड येथील लिलांजली सभागृहात सायं.४ वा. आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटनेशी संलग्न असलेली ‘सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना’ व्यापारी महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यरत आहे. विज ग्राहक संघटने मार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपविभाग निहाय भेट देऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन विजेच्या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ग्राहकांची संघटना स्थापन करीत आहे. या अनुषंगाने मालवण तालुक्यातील विजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढील रूप रेषा ठरविण्यासाठी व मालवण तालुका कार्यकारिणीची रितसर स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची मालवण तालुका बैठक दि. २७ ऑगस्ट रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

विजेच्या सततच्या भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा सनदशीर मार्गाने काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला या समितीत सहभागी होऊन आपले योगदान देता येईल, असे योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन विज ग्राहक संघटना मालवणचे अस्थायी अध्यक्ष समिर म्हाडगूत, मालवणचे अस्थायी सचिव प्रशांत हिंदळेकर, जिल्हा अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर व मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.उमेश नेरूरकर यांनी संयुक्तपणे केले आहे.

या बैठकीत मालवण विज ग्राहक संघटनेची कार्यकारीणी निवड करण्या बरोबरच मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना गणेश चतुर्थीला अखंडीत वीज पुरवठा होण्याच्या दृष्टीने संबंधीत वीज वितरण आधीकाऱ्यांशी चर्चा ही होणार आहे. त्याच बरोबर तालुक्यातील विजग्राहकांच्या विज पुरवठ्या संबंधी कोणत्याही तक्रारी असल्यास सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page