आचरा पंचक्रोशी मर्यादित भव्य राखी बनविणे स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२४-: सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त वायंगणी-चिंदर -त्रिंबक -आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य ” राखी बनविण्याची स्पर्धा “आयोजित केली आहे.

यासाठी
प्रथम पारितोषिक रुपये 1500/-
द्वितीय पारितोषिक – रुपये 1000/-
तृतीय पारितोषिक – रुपये 500/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून
ही स्पर्धा सर्व आबालवृद्धांकरिता विनामूल्य प्रवेश आहे राखी बनवताना एक मोबाईल विडिओ काढून तो परीक्षकांनी मागितल्यास त्यांना द्यावायचा आहे. इको फ्रेंडली राखीना प्रथम प्राधान्य राहील. तयार राखी दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत खाली दिलेल्या व्यक्तींकडे आहेर पाकिटात घालून त्यावर आपल नाव, पूर्ण पत्ता,आणि आपला व्हाट्स ऍप संपर्क क्रमांक लिहावा.अधिक माहितीसाठी तसेच राखी जमा करण्यासाठी संपर्क क्रमांक वायंगणी = श्री. संतोष वायंगणकर ( 7875201257/ 9420308478) त्रिंबक = प्रविण बागवे ( 9699069176) चिंदर = भाई तावडे (09420792990) आचरा = भाग्यश्री मेडिकल आचरा (9420308384) अनिकेत पांगे 9420260716 यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page