Headlines

सुपारीची चार पोती अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा…

पंधरा दिवसातील दुसरी घटना: शहरात घबराटीचे वातावरण बांदा/प्रतिनिधी    बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर रस्त्यावरील सोसायटीच्या लगत असलेल्या गणेश रेसिडन्स मधील दुकान फोडून आतील ६१ हजार ६०० रुपये किमतीची सुपारीची चार पोती अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला. याप्रकरणी बांदा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा शहरात गेल्या पंधरा दिवसात चोरीची दुसरी घटना घडल्याने शहरात घबराटीचे…

Read More

जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार

भाजपा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे आश्वासन.. ⚡कुडाळ ता.३०-:रॉयल फूड कंपनीला बॉयलर कोंबड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अनेक मागण्या कंपनीने मान्य केल्या असून प्रति किलो मागे १ रुपयाची दरवाढ करण्यासाठी भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्याशी कंपनीचे मालक मारियो यांनी सकारात्मक चर्चा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेच्या वतीने…

Read More

अवास्तव फुटपाथचे काम थांबवा…

सुरेश भोगटे यांची मागणी; बांधकाम व पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष.. सावंतवाडीशहरातील तीन मुशी जवळ सुरू असलेल्या फुटपाथचे काम अवास्तव न करता फुटपाथची रुंदी पुर्वी प्रमाणेच ठेवा अशी आग्रही भूमिका माजी नगरसेवक सुरेश भोगटे व विलास जाधव यांनी बांधकाम व पालिका प्रशासनाकडे केली. शहरातील तीन मुशी जवळ तुटलेल्या मोती तलावाचा संरक्षण कठडा उभारल्यानंतर फूटपाचे काम हाती…

Read More

बांद्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

त्यानंतर लोकांनी आपले नारळ नदीत टाकले. लोकांना तेरेखोल नदीवरील बांदा शेर्ला पुलावर उभे राहून कार्यक्रमात सहभाग घेता आला. पुलावर दुतर्फा तसेच खाली नदी काठीही लोकांची मोठी गर्दी होती. कार्यक्रमाच्या वेळी पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांना सोहऴ्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेता आला. ⚡बांदा ता.३०-: बांदा येथे नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. परंपरेप्रमाणे…

Read More

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुल्यात मच्छी विक्रेत्यांना छत्र्या वाटप…

⚡वेंगुर्ले ता.३०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ला बंदर येथील मच्छिविक्रेत्या महिलांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळच्या वेळी या महिला वेंगुर्ला बंदर येथे मासे विक्री करतात त्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने या छत्र्या देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, शिवसेना…

Read More

रानभाजीत वर्षा धोंड तर वनौषधी ओळखमध्ये सावरेश्वर बचत गट प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: आवेरे ग्रामस्थ आणि आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळा यांनी आयोजित केलेल्या रानभाजी पाककला आणि वनौषधी ओळख स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाजी पाककृती स्पर्धेत वर्षा यशवंत धोंड यांनी सादर केलेल्या ‘भरलेली कंटोळी‘ या पाककृतीने तर, वनौषधी ओळख स्पर्धेत सावरेश्वर महिला बचत गट आवेरेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Read More

कुडासे प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

दोडामार्ग l प्रतिनिधीकुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेजमध्ये मंगळवारी राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सचिव,राष्ट्रीय कबड्डी पंच दिनेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यसपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब ,ज्येष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई,पी.बी.किल्लेदार,सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.बी.शेंडगे होतेश्री. चव्हाण म्हणाले,हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते….

Read More

तिलारी खोऱ्यातून हत्ती कुंभवडेत

हत्तींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांची वनमंत्र्यांसोबत बैठक ⚡दोडामार्ग ता.३०-:दोडामार्ग तालुक्यातील केर मोर्ले आणि शिरवल परिसरात शेती बागायतीचे नुकसान करणारे हत्ती अखेर सोमवारी रात्री कुंभवडेत पोचले.पहिल्यांदाच तेथे दाखल झालेल्या हत्तींनी शेतकऱ्यांचे माड,पोफळी आणि केळी बागांचे नुकसान केले.हत्तींनी अरुण लाडोजी गावडे,महादेव गावडे आणि पांडुरंग शंकर कांबळे यांच्या शेती बागयतीचे नुकसान केले.दरम्यान,हत्तींना तिलारी खोऱ्यातून कर्नाटकातील नैसर्गिक अधिवासात पाठवावे यासाठी हत्ती…

Read More

सावंतवाडी मोती तलावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोती तलाव भोवती सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती. यावेळी अर्पण करण्यात आलेल्या सुवर्ण नारळ सावंतवाडी राजघराण्याकडून देण्यात आला होता. यावेळी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते नारळाचे विद्यिवत पूजन करून नारळ तलावात अर्पण करण्यात आला .यावेळी…

Read More

राष्ट्रवादी महिला, युवती काँग्रेसकडून पोलीस बंधू, भगिणी यांच्यासाठी पार पडला रक्षाबंधन उपक्रम

⚡सावंतवाडी ता.३०-: देशबांधव विविध सण उत्सव साजरे करत असताना आपले पोलिस बंधू भगिनी आपल्या सुरक्षेसाठी मात्र अहोरात्र ‘ऑन ड्युटी’ असतात. देशबांधवांची रक्षा करून खऱ्या अर्थाने बंधुत्वाचे कर्तव्य आपले पोलिस बंधू भगिनी अथकपणे पार पाडत असतात. त्यांच्या या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page