दोडामार्ग l प्रतिनिधी
कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेजमध्ये मंगळवारी राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सचिव,राष्ट्रीय कबड्डी पंच दिनेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यसपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब ,ज्येष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई,पी.बी.किल्लेदार,
सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.बी.शेंडगे होते
श्री. चव्हाण म्हणाले,
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 आणि 1936) नोंदवली आहे. अनेक दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सरकार कडून 1956 मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिवशी शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्थांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवशी क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी भारताच्या राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह प्रमुख क्रीडा संबंधित पुरस्कार प्रदान करतात.
बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीसंघाचे नेतृत्व
हॉकीतील लक्षवेधी कामगिरीनंतर ध्यानचंद यांना 1927 मध्ये ‘लांन्स नायक’ पदावर बढती देण्यात आली. 1932 मध्ये नायक आणि 1936 मध्ये सुभेदार अशी बढती त्यांना मिळाली. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा असे वर्णनही ऐकायला मिळते. मेजर ध्यानचंद यांनी 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केल होते.
खेलरत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले.
सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांनी तर प्रस्तावना श्री. शेंडगे यांनी केली. श्री.देसाई यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कुडासे प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
