तिलारी खोऱ्यातून हत्ती कुंभवडेत

हत्तींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांची वनमंत्र्यांसोबत बैठक

⚡दोडामार्ग ता.३०-:
दोडामार्ग तालुक्यातील केर मोर्ले आणि शिरवल परिसरात शेती बागायतीचे नुकसान करणारे हत्ती अखेर सोमवारी रात्री कुंभवडेत पोचले.पहिल्यांदाच तेथे दाखल झालेल्या हत्तींनी शेतकऱ्यांचे माड,पोफळी आणि केळी बागांचे नुकसान केले.हत्तींनी अरुण लाडोजी गावडे,महादेव गावडे आणि पांडुरंग शंकर कांबळे यांच्या शेती बागयतीचे नुकसान केले.
दरम्यान,हत्तींना तिलारी खोऱ्यातून कर्नाटकातील नैसर्गिक अधिवासात पाठवावे यासाठी हत्ती हटाव मोहीम राबवा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी केर,मोर्ले, हेवाळे,सोनावल, पाळये, तेरवण मेढे येथील शेतकरी आणि तालुक्यातील अनेक गावचे सरपंच मंत्रालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी मंत्रालयात गेले आहेत.तर दुसरीकडे एक एक गाव पादाक्रांत करत हत्ती कुंभवडेत पोचले आहेत.तेथून ते आंबोलीला जातात की पुन्हा केर,मोर्ले परिसरात जातात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.वनमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी कुंभवडेतील हत्तींना हाकलण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी गावकरी करत आहेत.

You cannot copy content of this page