सुरेश भोगटे यांची मागणी; बांधकाम व पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष..
सावंतवाडी
शहरातील तीन मुशी जवळ सुरू असलेल्या फुटपाथचे काम अवास्तव न करता फुटपाथची रुंदी पुर्वी प्रमाणेच ठेवा अशी आग्रही भूमिका माजी नगरसेवक सुरेश भोगटे व विलास जाधव यांनी बांधकाम व पालिका प्रशासनाकडे केली.
शहरातील तीन मुशी जवळ तुटलेल्या मोती तलावाचा संरक्षण कठडा उभारल्यानंतर फूटपाचे काम हाती घेण्यात आले आहे परंतु नवीन संरक्षण घटना उभारल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण वाढले आहे मात्र फुटपात उभारताना पूर्वीच्या जागेपर्यंत तो वाढवल्याने काम अशोभनीय असे दिसत होते 19 याबाबत श्री भोगटे व जाधव यांनी कामाबाबत पालिका प्रशासन व बांधकाम प्रशासनाचे लक्षवेधक तीन मुशी परिसरातील होणारे अपघात लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगून फुटपटचे काम एका आकाराचे असल्यास तलावाचे सुशोभीकरण दिसेल त्यामुळे वाढीव रुंदीकरण टाळून समान फुटपात उभारा असे आग्रही मागणी केली.
