Headlines

पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे…

तहसीलदार वर्षा झालटे ; हडी फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघाकडून विद्यार्थाचा गुणगौरव ⚡मालवण ता.१६-: स्वतः बरोबरच तुमचे आई वडील व गावाचे नाव रोशन करा. पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखावे. मोबाइल वाईट नाही परंतु त्यात जास्त गुंतून राहणे धोक्याचे आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक ही आपली संपत्ती…

Read More

गरीब व गरजू लोकांच्या जीवनात आनंद व सुख आणणे हेच मातृत्व आधार फाउंडेशनचे काम…

संतोष लुडबे; चौथा वर्धापन दिन संपन्न ⚡मालवण ता.१६-: समाजात बारकाईने पाहिले तर अनेक माणसे ही परिस्थितीशी झगडत जीवन व्यतीत करत असतात. आपण सुखाने जगत असलो तरी समाजातील अशा माणसांकडेही आपण लक्ष देऊन आपल्याला जमेल तशी मदत आपण केली पाहिजे. याच उद्दिष्टाने मातृत्व आधार फाउंडेशनची स्थापना होऊन गेली चार वर्ष ही संस्था समाजातील तळागाळातील गरजू लोकांसाठी…

Read More

जिल्हा बँक तळेबाजार शाखा एटिएम चे नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

⚡ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखा नविन एटिएम चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरूवार दि.१७ऑगस्ट २०२३ रोजी साय.५.००वा. करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक प्रकाश बोडस,आदि मान्यावर उपस्थित रहाणार आहेत सदर…

Read More

वेटींग लिस्टचा घोळ संपवा आणि तिकिट बुकींगमध्ये होणारा काळा बाजार बंद करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली मागणी ⚡कणकवली ता.१६-: कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या गाडयांचे बुकींग चार महिने अगोदर केले गेले असल्याने ८०० ते ८५० प्रवाशी वेटींग लिस्टवर आहेत. गणेशोत्सवानिमित्त सुरू होणाऱ्या नवीन गाडयांमध्ये सर्व वेटींग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना वर्ग करण्यात यावे अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर यांच्याकडे केली…

Read More

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी कारिवडेतील एकावर गुन्हा दाखल…

⚡सावंतवाडी ता.१६-: कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसलेल्या व्यक्तिने राष्ट्रगीताचा अवमान केला म्हणून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरविंद नारायण गावडे रा. कारिवडे गावठणवाडी असे त्याचे नाव आहे. त्याने खाजगी जमिनीतील खड्डा बुजवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर स्वातंत्र्यदिनी सुरू केले होते. दरम्यान सकाळी ध्वजारोहणावेळी राष्ट्रगीत सुरू असताना तो ध्वजस्तंभाजवळ बसूनच राहिला त्यांनी केलेल्या या प्रकाराबाबत…

Read More

आम. नितेश राणे यांच्या शिफारशीने ५ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी

कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विकास साधणार ⚡कणकवली ता.१६-: कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम. नितेश राणे यांच्या शिफारशीने महाराष्ट्र शासनाने २५१५ योजनेअंतर्गत सन २०२३ / २४ मधून ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ५ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिलेली आहे. अशी माहिती आम. नितेश राणे यांच्यामार्फत देण्यात आली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन…

Read More

कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट उद्या राजीनामा देणार

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले असून हा राजीनामा उद्या, गुरुवार १७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष यांच्याकडे देणार आहेत. कुडाळ नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्याबद्दल दीड वर्ष उलटून गेले आहे. या सत्तासंघर्षामध्ये काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष…

Read More

ना. रविंद्र चव्हाण यांच्यावर विश्वास नसल्यानेच महामार्गाच्या प्रश्नावर नारायण राणेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट

आमदार वैभव नाईक यांचा राणेंना टोला:राणेंनी अद्यापही रविंद्र चव्हाण यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही.. कणकवली 16 ऑगस्ट (प्रतिनिधी)- ना. रविंद्र चव्हाण यांच्यावर नारायण राणेंना विश्वास नसल्याने राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली. असा टोला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे. आमदार वैभव नाईक…

Read More

२० हजारच्या गांजा सह वेंगुर्ला तालुक्यातील महिलेला अटक…

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई:गुन्हा दाखल वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक महिला गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होती. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तिला पकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

Read More

ओसरगाव तलावात जल पर्यटनाचा शुभारंभ

स्थानिक युवकांनी तराफा बनवीत केला प्रयोग ⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलावामध्ये गावातील गवळवाडीतील स्थानिक युवक यांनी साध्या पद्धतीचा तराफा बनवून जल पर्यटन करण्याचा शुभारंभ केला. स्वखर्चाने बनवलेला तराफा स्वतःच्या जबाबदारीवर प्रायोगिक तत्त्वावर बोटिंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसरपंच बबली राणे ,अक्षय राणे, नितीन धुरी, अक्षय शिंदे, सुरज कदम, सुनील राणे, महेश…

Read More
You cannot copy content of this page