बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाचा स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम…

⚡कणकवली ता.०२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.यामध्ये नाथ पै नगर येथील बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाने स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम राबवला. सोमवारी दिवसभर शालेय मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाकावू प्लास्टिकाच्या हजारो बाटल्या गोळा केल्या आणि स्वच्छतेबरोबरचप्लास्टिकमुक्तीचाअनोखा संदेश दिला. यावेळी स्वच्छतेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी १० बाटल्या हून अधिक बाटल्या व कचरा गोळा केला.या शालेय मुलांना मंडळातर्फे कॅडबरी व चॉकलेट वाटप करण्यात आले. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी मनोहर पालयेकर, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, मानसी मुंज,रमेश जोगळे,प्रशांत कुडतरकर, अमित मयेकर योगेश मुंज,निलेश पवार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page