मळगावत नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसाच्या औचित्य: १४३ जणांनी घेतला घेतला लाभ…

सावंतवाडी : सहदेव राऊळ : सुधीर राऊळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधीर राऊळ मित्र मंडळ मळगाव आणि सहाय्यक लॉरेन्स अँड मेयो सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावमध्ये घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचा एकूण १४३ जणांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमास मनसेचे जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर, प्रशालेचे चेअरमन मनोहर राऊळ, मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, अॅड. राजू कासकर, सतीश आकेरकर, माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मळगावचे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिद्धेश तेंडुलकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, दाजी सावंत, सुभाष नाटेकर, सुखदेव राऊळ, पंढरीनाथ गावकर, तुषार वालावलकर, योगेश चिंदरकर, भजन दशावतार हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शतायु जांभळे, राकेश परब, साहिल तळकटकर, ओमकार नवार, महेंद्र कांबळी, सिद्धेश सावंत, केतन सावंत, अजित पोळजी, सुदेश राऊळ, अनिकेत दळवी, तुषार पोळजी, प्रथमेश राणे, अक्षय माळकर, संदीप राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page