वैश्यवाडा मारुती मंदिर गणेश मंडळाकडून पालिकेला कपडे व भांडी सुपूर्द…

पालिकेच्या आवाहनला प्रतिसाद; मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक…

सावंतवाडी
येथील वैश्यवाडामारुती मंदिर  गणेश मंडळ यांचे वतीने कपडे व भांडी नगरपरिषदेला प्रातिनिधिक स्वरूपात रोजी सुपूर्द केले. पालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश मंडळांना अशा प्रकारच्या वस्तू आणून देण्याचे आवाहन केले होते या पार्श्वभूमीवर या वस्तू देण्यात आल्या.

यावेळी आनंद नेवगी ,दीपक म्हापसेकर, संतोष सुकी ,विलास सुकी, आनंद म्हापसेकर,अण्णा म्हापसेकर, संजय म्हापसेकर, विनू सुकी, सुजाता कोदे,यश जीवणे,  ओंकार म्हापसेकर ,संकेत शिरसाठ व मंडळातील सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले
स्वच्छता ही सेवा , व स्वच्छता पंधरवडा निमित्त .सावंतवाडी नगर परिषदेतर्फे सर्व गणेश मंडळांची बैठक गणेशोत्सवापूर्वी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान तसेच तीन आर प्रिन्सिपल म्हणजेच Reduce Reuse Recycle, अंतर्गत वापरलेल्या वस्तू , भांडी कपडे इत्यादी सामान , ज्या वस्तू इतर व्यक्ती वापरू शकतील अशा आणून देण्याचे आवाहन नगरपरिषदेतर्फे गणेश मंडळांना करण्यात आले होते.
दरम्यान याबाबत बोलतांना श्री नेवगी म्हणाले, विविध सामाजिक उपक्रम वैश्यवाडा गणेशोत्सव मंडळ तर्फे दरवर्षी घेण्यात येत असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील हा सामाजिक उपक्रम ,मंडळाच्या वतीने घेण्यात आला.

You cannot copy content of this page