⚡मालवण ता.०२-: महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मालवण तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानाकाच्या परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी श्रमदान करीत या दोन्ही कार्यालयाच्या परिसरातील कचरा व वाढलेली झाडी तोडून परिसर स्वच्छ केला.
या स्वच्छता मोहिमेत मातृत्व आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तहसील कार्यालय व पोलीस स्थानक परिसरातील वाढलेली झाडी व चार काढण्यात आली. तसेच परिसरातील झाडांचा पाला पाचोळा व इतर कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत गोळा केलेला कचरा नगरपालिकेच्या सहकार्याने कचरा वाहक गाडीत भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी व महसूलचे अधिकारी यांनीही सहभाग घेत मोहिमेबद्दल मातृत्व आधार फाउंडेशनचे आभारही मानले.
या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पोलिस उपनिरीक्षक श्री. खोत, नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, पोलीस हवालदार श्री.जानकर, जयमाला मयेकर, मिलींद झाड, जगदिश तोडणकर, सतीश भगत, संदीप लुडबे, बाबू ढोले, काजल तोडणकर, गया ढोके, संदीप नेवाळकर, गौरव कांदळगावकर, लहू केळुस्कर, झहीर शेख, आदी व इतर सहभागी झाले होते.
