⚡दोडामार्ग ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीनी आदर्श घ्यावा असे कार्य कुडासे खुर्द ग्रामपंचायतीने केले आहे कित्येक गावांना निधी मिळत नाही अशा स्थितीत गावात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आणून गाव विकास करण्याचे काम इथे झाले आहे.असे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन वसाहत) ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी उपसभापती राजेद्र निंबाळकर, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण ,उद्योजक विवेकानंद नाईक सरपंच संगीता सुहास देसाई, रामदास मेस्त्री योगेश महाले, संजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य संदेश देसाई, गोविंद नाईक सुरत शिरसाट, सदस्य मयुरी महेश पालव, सानवी संदिप दळवी, संजना संजय सावंत, ग्रामसेविका ज्योती डोंगरदिवे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार व स्वागत सरपंच व सदस्य यांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देउन करण्यात आला नूतन इमारतीचे फित कापून माजी आमदार राजन तेली यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक सरपंच संगीता देसाई यांनी केले.त्यांनी ग्रामपंचायतीची वाटचाल विषद केली.विवेकानंद नाईक, राजेद्र निंबाळकर,चेतन चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन सुहास देसाई यांनी केले. …………
सर्व राजकीय पक्षांची साथ
गणेश प्रसाद गवस म्हणाले,
गावातील रस्त्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भरपूर निधी दिला . सरपंच व सदस्यांनी विविध योजना मधून निधी मिळवला. आमदार निधी वर्षासाठी एक कोटी मिळतो; पण या छोट्या ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण करून एक कोटी सोळा लाख रु. एवढा प्रचंड निधी आणला.सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी सहकार्य केले.आपलेही सहकार्य कायम राहील.
