माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंमुळे निराधाराला मिळाला आधार…
सविता आश्रमाला बांधकाम साहित्यासाठी आर्थिक मदत ⚡कणकवली ता.०४-: गेले काही दिवस कणकवली पटकी देवी मंदिराजवळ असलेल्या पिकअप शेडमध्ये विमनस्क स्थितीत असलेल्या एका व्यक्तीबाबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे तेथील पटकीदेवी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लक्ष वेधले. व त्यानंतर समीर नलावडे यांनी तात्काळ त्याची दखल घेत सविता आश्रमाचे संदीप परब…
