⚡देवगड ता.०३-: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित नुकत्याच घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी साठी प्रविष्ट झालेले सहाही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
याप्रशालेतील कुमारी अंजली राजेंद्र भोसले हिने सर्वाधिक 98 गुण प्राप्त केले. तर विघ्नेश मिठबावकर, दुर्वास राणे माही कामतेकर, ईश्वरी मिठबावकर, शर्वी मिठबावकर यानी 90 पेक्षा जास्त गुण प्राप्त करत या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंखे, सहाय्यक आदर्श शिक्षक दीपक डवर, पदवीधर शिक्षक तुषार औटी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण मोंडे, उपाध्यक्ष दीपक कामतेकर व सर्व सदस्य, ग्रामस्थांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच होणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेसाठी हे सहाही विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
