वनविभागाचे आश्वासन; सकाळपासून सुरू होते आंदोलन
⚡आंबोली ता.०३-: आंबोलीत ठाण मांडून बसलेल्या हत्तीचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी आज आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन अखेर रात्री वनविभागाच्या लेखी आश्वासनाअंती स्थगित करण्यात आले.दरम्यान आज आंबोली ग्रामस्थांनी हत्तीच्या प्रश्नावर आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर सकाळी आंदोलन छेडले होते

