सावंतवाडी पोलिसांची कारवाई:न्यायालयाने ठोठावली पोलीस कोठडी
⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून गांजा प्रकरणी करणारा राहुल मारुती राठोड (वय. 19 सध्या रा.कुडाळ ) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तलवार तसेच दुचाकी आणि पंधराशे रुपये किमतीचा गांजा जप्त केला येथील न्यायालयात राठोड याला हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे स्थानिक गुन्हा अन्वेषणने सोमवारी कोलगाव काजरकोंड येथे गांजा पार्टीवर धाड टाकून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार राठोड याला सोमवारी कुडाळ रेल्वे स्टेशनवर जेरबंद करण्यात आले
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी कोलगांव काजरकोड चर्चच्या पाठीमागील एका घराचे कम्पाऊड असलेल्या माड बागायतीमध्ये संशयित कॅजीटन रोदल रॉड्रीक्स वय 31 वर्षे रा. कोलगाव काजरकोट, चर्चच्या पाठीमागे ता. सावंतवाडी सौरभ मधू कदम वय 24 वर्षे रा. ज्युस्तीन नगर, ज्युस्तीन रेसीडन्सी, एस- 12 सावंतवाडी मुळ रा.कुंबल कदमवाडी ता. दोडामार्ग है गांजा अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना मिळून आले म्हणून त्यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 27 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली होती या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने हा तपास सावंतवाडी पोलिसांना दिला निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या गुन्ह्याचा कसून तपास करताना या दोघांकडून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची माहिती घेतली त्यावेळी राहुल राठोड याचे नाव समोर आले होते संशयित सौरभ कदम याला कुडाळ रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी पोलिसांनी नेले आणि सापळा रचला. राठोड तेथे दुचाकी घेऊन आला. सौरभकडे गाजाची पुढी देत असताना राठोड ला पोलिसानी जेरबंद केले.
